शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निरा येथील ज्युबिलीयन्ट कंपनीत वायु गळती-चाळीस जणांना श्वसनाचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 11:20 IST

निरा येथील ज्यूबिलीएन्ट लाईफ सायन्स लि. कंपनीमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ‘अन हायड्रेड’ या विषारी वायू गॅस गळतीमुळे चाळीस कामरांना श्वसनाचा त्रास होऊ लागला

ठळक मुद्देखबरदारी म्हणून परिसर खाली

लोणंद : निरा येथील ज्यूबिलीएन्ट लाईफ सायन्स लि. कंपनीमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ‘अन हायड्रेड’ या विषारी वायू गॅस गळतीमुळे चाळीस कामरांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना निरा लोणंद येथील वेगवेगळ्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेकीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून परिसर खाली करण्यात आला आहे.

निरा येथे ज्यूबिलीएन्ट लाईफ सायन्स लि. या कंपनीचा केमिकल इंटर मेडिएटस प्लॅन्ट आहे. या ठिकाणी अ‍ॅसिटीक अनहायट्रेड अ‍ॅसिड, इथलॉन अ‍ॅसिटीट व एक्स्ट्रा नॅचरल अल्कहोलची निर्मिती केली जाते. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास या परिसरात काम करणाºया कामगारांना या विषारी वायू गळतीमुळे श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर एकच धावपळ उडाली. यामधील सोळा जनांना निरा येथील एका खासगी  हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.

लोणंद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बारा रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. यामध्ये रमेश काकडे, नाना यादव, संजय ढवळे, आखिलेश कुमार, प्रमोद बापट, मल्हारी घुखे, मयुर कदम, संजय कदम, लक्ष्मण तोडकर, विनोद चौगुले, सुनिल गुरव असून दुसºया खासगी हॉस्पिटलमध्ये अविनाश सूर्यवंशी, शाम नाईक, अक्षय राजे, हनुमंत पाणेळे तर अन्य एका हास्पीटलमध्ये अमोल गायकवाड, लखन गायकवाड, दत्तात्रय  गायकवाड, सुनिल शिंदे उपचार घेत असून यामधील एकास रात्री पुण्याला हलविण्यात येणार आहे.रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता ...खबदरीचा उपाय म्हणून या ठिकाणाचा सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. अ‍ॅसिटीक आहायट्रेज हा विषारी वायू डोळे, नाक यांच्याद्वारे फुफ्फुसात गेल्यामुळे दम लागतो. डोळे व नाकाच्या अंतरत्वचेचा दाह होणे, डोळे लाल होतात. वेळीच उपचार न मिळाल्यास रूग्ण दगाऊ शकतो, अशी माहिती लोणंद येथील डॉ. डोंबाळे यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातMIDCएमआयडीसीSatara areaसातारा परिसर