कोरोनाकाळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:30+5:302021-06-26T04:26:30+5:30

रामापूर : ‘कोरोनाकाळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची ...

Agriculture survives due to agricultural income during Corona period: Shambhuraj Desai | कोरोनाकाळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : शंभूराज देसाई

कोरोनाकाळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : शंभूराज देसाई

रामापूर : ‘कोरोनाकाळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली,’ असा विश्वास राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत नवारस्ता (ता. पाटण) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, ‘शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना योजना समजावून सांगाव्यात आणि त्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यावे.’

या वेळी देसाई यांच्या हस्ते तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि कृषी विभागामार्फत बियाणे व युरिया ब्रिकेट्सचे वाटप करण्यात आले.

या मेळाव्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पाटील, सरपंच विष्णू पवार आदी पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्र कालवडेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, मंडळ कृषी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Agriculture survives due to agricultural income during Corona period: Shambhuraj Desai