कऱ्हाडला रंगकर्मींचे नांदी करून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST2021-09-04T04:45:47+5:302021-09-04T04:45:47+5:30

कऱ्हाड : येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील रंगकर्मींनी रंगदेवतेची पूजा व नांदी करून आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

The agitation started with the help of painters | कऱ्हाडला रंगकर्मींचे नांदी करून आंदोलन

कऱ्हाडला रंगकर्मींचे नांदी करून आंदोलन

कऱ्हाड : येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील रंगकर्मींनी रंगदेवतेची पूजा व नांदी करून आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कार्यक्रम पूर्ववत सुरू व्हावेत, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

गेले दीड वर्ष कोरोना महामारी संकटामुळे गर्दी करण्यावर बंदी आहे. त्यामुळे नाटक, चित्रपटगृह, तमाशा आदी कार्यक्रम बंद आहेत. मात्र, त्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शासन त्यांची कुठलीही दखल घ्यायला तयार नाही. ही दखल घ्यावी म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन आज करण्यात करण्यात आले.

यावेळी रंगकर्मींनी बंद नाट्यगृहाच्या कुलपाची आरती केली. त्याचबरोबर रंगमंचावर रंगदेवतेची पूजा केली. त्यानंतर नांदी म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जुगलकिशोर ओझा, चित्रपट दिग्दर्शक वासू पाटील, संजय पाटील, जितेंद्र मगरे, प्रमोद गरगटे, प्रशांत कुलकर्णी, ॲड. अनिता वरेकर आदी कलाकारांची उपस्थिती होती

फोटो

कऱ्हाड येथे रंगकर्मींचे आंदोलन झाले. त्यात सहभागी झालेले कलाकार.

Web Title: The agitation started with the help of painters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.