शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मुलावर अघोरी कृत्य, चिडचिड करते म्हणून दिले चटके; मिरजेतील पाच जणांवर जादुटोण्याचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 11:48 IST

मुलाला सलग दोन दिवस मंत्रतंत्र करून टांगले गेले

सातारा : लहान मूल चिडचिड करत असल्याने त्यावर उपाय म्हणून मुलाला चटके देणे, गळ्याला घट्ट काळा दोरा बांधणे, घरात लटकवणे यासारखे अघोरी कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील मिरजमधील पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.मेहबूब कादर अली, शमशुद्दीन मेहबुब अली, शमशुद्दीन कादर अली, मुमताज मेहबूब अली, फातिमा सरफराज पठाण (सर्व रा. शमनामिरा काॅलनी, ख्वाजा बस्ती रेल्वे स्टेशन पाठीमागे, मिरज, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सरफराज खलील पठाण (४२, रा. समर्थनगर, एमआयडीसी, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरफराज यांना तीन मुले आहेत. यातील एक लहान मुलगा नेहमी चिडचिड करत असे. त्यामुळे त्यांची पत्नी मुलांना घेऊन काही दिवसांपूर्वी मिरजला गेली होती. त्यावेळी या सर्व मुलांचे टक्कल करण्यात आले. तर एका मुलाला सलग दोन दिवस मंत्रतंत्र करून टांगले गेले. मिरजवरून साताऱ्यात आल्यानंतर मोठ्या मुलीने हा प्रकार वडिलांना सांगितला.लाॅकडाऊनमध्ये मुलगा जास्तच चिडचिड करू लागला. यामुळे पठाण यांच्या पत्नीने वरील संशयितांच्या सांगण्यावरून मुलाला चटके दिले. अशा प्रकारची अघोरी कृत्य वारंवार होऊ लागल्यानंतर पठाण यांनी वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, असा न्यायालयात अर्ज केला.या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने मिरजमधील पाचजणांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले. यावरून पोलिसांनी रविवारी संशयितांवर गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक मछले हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी