शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:05 IST

corona virus Sataranews- कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक अडचणी वाढतील. उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहील, त्यासोबतच जे लोक या उद्योग, व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची उपासमार होईल. त्यामुळे अन्य पर्याय निवडावा, अशी मागणी जिल्ह्यातील उद्योजक करत आहेत.

ठळक मुद्देपुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच पर्यायअन्य पर्याय निवडावा, अशी जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी

सातारा : कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक अडचणी वाढतील. उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहील, त्यासोबतच जे लोक या उद्योग, व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची उपासमार होईल. त्यामुळे अन्य पर्याय निवडावा, अशी मागणी जिल्ह्यातील उद्योजक करत आहेत.संपूर्ण राज्यासोबत सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असल्याने शासन लॉकडाऊनच्या तयारीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार, या भीतीमुळे लोकांच्या पोटात गोळा आलेला आहे.

बँकांनी त्यांच्या पाठीमागे कर्ज वसुलीचा तगादा लावलेला आहे. बँकांची पुन्हा एकदा वसुली सुरू केली आहे. उद्योग बंद झाले तर अनेक अडचणी निर्माण होतील. शासनाने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाहीदेखील दिली जात आहे.

  •  कोरोनाचे एकूण रुग्ण- ५८०३१
  • बरे झालेले रुग्ण -५५२७४
  • कोरोना बळी - १८४८

जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी गायब झाल्याची लोकांमध्ये भावना तयार झाल्याने कोरोना पुन्हा वाढला. लोकांनी मास्क कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील छोटे उद्योजक अडचणीत सापडले आहेत. या उद्योजकांच्या पाठीमागे बँकांचा कर्ज वसुलीसाठी ससेमिरा सुरू झालेला आहे. लॉकडाऊन केल्यास उद्योजकांसमोर अडचणी वाढतील. लोकांनी आपली तसेच दुसऱ्याचीदेखील काळजी घेऊन नियम पाळल्यास कोरोना महामारी थांबू शकेल.- बाळासाहेब महामुलकर, उद्योजक

जिल्ह्यातील उद्योजकांनी सर्व प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. इथून पुढच्या कालावधीतदेखील आम्ही काळजी घेऊ, परंतु शासनाने कुठल्याही परिस्थितीत उद्योग बंद ठेवू नयेत. उद्योग बंद झाले तर अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, याची काळजी घेणेही आवश्यक आहे.- श्रीकांत तोडकर, उद्योजक

जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी केली असल्याने आता रात्रीच्या शिफ्ट बंद कराव्या लागणार, अशी शक्यता आहे. मात्र, उद्योग सुरू ठेवण्यासाठी कामगारवर्ग कंपन्यांमध्ये येणे आवश्यक आहे. त्यामुळे मासच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे रात्रीच्या वेळी कंपन्यांचे काम सुरू ठेवण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.- उदयसिंह देशमुख, अध्यक्ष मास

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर