राजेंनी टोल नाक्याच्या वादापेक्षा अफजल खानकबरीचा प्रश्न सोडवावा : नितीन शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:20 IST2017-11-21T00:19:25+5:302017-11-21T00:20:51+5:30
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाºया साताºयातील दोन्ही राजेंनी टोलनाक्यांचे वाद घालत बसण्यापेक्षा प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला वाढत असणाºया अनधिकृत बांधकामाकडे लक्ष द्यावे,

राजेंनी टोल नाक्याच्या वादापेक्षा अफजल खानकबरीचा प्रश्न सोडवावा : नितीन शिंदे
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाºया साताºयातील दोन्ही राजेंनी टोलनाक्यांचे वाद घालत बसण्यापेक्षा प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला वाढत असणाºया अनधिकृत बांधकामाकडे लक्ष द्यावे, ते पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन माजीआमदार नितीन शिंदे यांनी
पत्रकार परिषदेत केले. शिवप्रतापदिनाच्या सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाºया शिवप्रेमींना मज्जाव केला जातो, त्याउलट अधिकारी केवळ चैनीसाठी या सोहळ्याकडे जातात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
किल्ले प्रतापगड येथे २६ नोव्हेंबर रोजी शिवप्रतापदिन साजरा केला जाणार आहे. २००० पासून या उत्सवात मी सहभागी होत आलो आहे. प्रतापगड येथील अफजल खान कबरीच्या अनधिकृत बांधकामाबाबत मी विधीमंडळात आणि शासन स्तरावर आवाज उठविला आहे. जिल्हा प्रशासनाने मला नुकतीचजिल्हा बंदीची नोटीस पाठविली आहे. मी महाराष्ट्र विधीमंडळाचा माजी सदस्य असून, मला भारताचा नागरिक म्हणून असणाºया माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. शासनाच्या वतीने साजरा होणाºया शिवप्रतापदिन कार्यक्रमातसकाळी सात वाजल्यापासूनकार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित राहायचे आहे.मागील वर्षी मला सशर्त परवानगी देण्यात आली होती. तशी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या नोटीसीला उत्तर देताना केलीआहे, असे नितीन शिंदे यावेळी म्हणाले.दरम्यान, शिवप्रतापदिन सोहळा पूर्णपणे शासकीय कार्यक्रम झाला आहे. जिल्ह्यातील अधिकारी मंडळी नाईलाजाने या कार्यक्रमालायेतात. हा कार्यक्रम कधी
संपतो, याचीच सर्वजण वाट पाहत असल्याचे पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड पराक्रमाचे स्मरण राहण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो. परंतु मनापासून या उत्सवासाठी येऊ इच्छिणाºया शिवप्रेमींना या उत्सवात सहभागी होण्यास मज्जाव घातला जातो, हे दुर्दैवी आहे असेही ते शेवटी म्हणाले.
मोझर यांच्याशी चर्चा करणार
शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करावे, यासाठी माझा आग्रह आहे. या पक्षाचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी मोठे संघटन केले आहे. हे संघटन शिव कार्यासाठी उपलब्ध करावे, अशी मागणी संदीप मोझर यांच्याकडे करणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.