शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना १०० टक्के भरले, पाऊस वाढल्याने धरणातून विसर्ग सुरू; दोन वर्षानंतर पूर्ण साठा 

By नितीन काळेल | Updated: September 4, 2024 13:07 IST

धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून पुन्हा विसर्ग सुरु

सातारा : जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर कोयना धरण १०० टक्के भरले. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला. तर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे एक फुटाने उचलून साडे नऊ हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे. तर पश्चिम भागात मागीलवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही मोठी धरणे भरल्यातच जमा आहेत. तर कोयना पाणलोट क्षेत्रातही मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला. दोन वर्षानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरले. तर बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून ९ हजार ५४६ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाच्या पायथा वीजगृहातूनही २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. धरणातून एकूण ११ हजार ६४६ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

नवजाला ८९ मिलिमीटर पाऊस..जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ८९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनेला ४८ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटर पाऊस झाला. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे ५ हजार ९९५, कोयना ५ हजार ७६ आणि महाबळेश्वरला ५ हजार ७७४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

कोयनेत गतवर्षी ९५ टीएमसीपर्यंतच साठा..जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाले होते. सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली नव्हती. कोयना धरणात ९५ टीएमसीपर्यंतच पाणीसाठा झाला होता. पण, यावर्षी कोयना धरण भरल्याने सिंचनाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच वीजनिर्मितीसाठीही अडचण येणार नाही

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण