आगाशिवनगरात दुचाकीच्या घासाघासीनंतर बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:33+5:302021-05-23T04:39:33+5:30
कांही काळ तनावाचे वातावरण पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरन शांत लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : दोन दुचाकींची घासाघासी झाल्यानंतर दुचाकी घसरून ...

आगाशिवनगरात दुचाकीच्या घासाघासीनंतर बाचाबाची
कांही काळ तनावाचे वातावरण
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरन शांत
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : दोन दुचाकींची घासाघासी झाल्यानंतर दुचाकी घसरून एका दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी झाले. यामुळे दोन्ही दुचाकीस्वारांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत झाले. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर पवारमामा बझार समोर सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार फिरस्त्या समाजातील युवकांसह तिघे दुचाकीवरून शिवछावा चौकाकडून आगाशिवनगरकडे जात होते. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर येथील पवार मामा बाझारसमोर आले असता दुसऱ्या दुचाकीबरोबर घासाघासी झाली. या अपघातात त्या फिरस्त्या युवकांची दुचाकी घसरून पडल्याने दुचाकीवरील युवकांच्या पायाला लागल्याने दोघे किरकोळ जखमी झाले. यावेळी दोन्ही दुचास्वारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. फिरस्त्या युवकांनी जास्तच गोंधळ घातल्याने क्षणार्धात महिलांसह त्या समाजाचे नागरिक घटनास्थळी गोळा झाल्याने आणखीनच गोंधळ वाढला. यावेळी झालेल्या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची खबर तत्काळ शिवछावा चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबत तातडीने कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठांना सांगितले. खबर मिळताच अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हस्तक्षेप करून मध्यस्थी केल्यामुळे वातावरण शांत झाले. त्यानंतर पोलिसांनी किरकोळ जखमी युवकांना रिक्षाने उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.
चौकट
घटनेबाबत घटनास्थळी उलटसुलट चर्चा
शिवछावा चौक ते पवारमामा बझारदरम्यान या दोन दुचाकीस्वारांमध्ये नेमके काय झाले? फिरस्त्या समाजातील युवकांनी एवढा गोंधळ का केला? दोन पोलीस गाड्यांसह एवढा मोठा फौजफाटा का आला ? याबाबत नेमके कोणाला काहीच समजले नाही. घटनास्थळी मात्र उलटसुलट चर्चा सुरू होती.
चौकट
फोटोशूट करणाऱ्याचा मोबाईल ताब्यात
कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावरील गोंधळ आणि पोलीस फौजफाटा बघून घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. नेमके काय झाले, हे कुणाला काहीच कळत नव्हते. अशातच बघ्यांमधील एक इसम फोटोसेशन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विनाकारण फोटोसेशन का करतोस, असे म्हणत त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला.
फोटो : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर दोन दुचाकींची घासाघासी झाल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे घटनास्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. (छाया : माणिक डोंगरे)
फोटो नेम : २२ डोंगरे
===Photopath===
220521\img_20210522_151416.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
कराड-ढेबेवाडी रस्त्यावर दोन दुचाकींची घासाघासी झाल्यानंतला झालेल्या गोंधळामुळे घटनास्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. (छाया माणिक डोंगरे)