तब्बल तीन वर्षांनंतर फलटणला दमदार पाऊस

By Admin | Updated: August 25, 2014 22:14 IST2014-08-25T20:17:24+5:302014-08-25T22:14:18+5:30

वनवास संपला : वसनाच्या ८६ गावांत सुरू होती हेळसांड

After three years, Fattan received heavy rainfall | तब्बल तीन वर्षांनंतर फलटणला दमदार पाऊस

तब्बल तीन वर्षांनंतर फलटणला दमदार पाऊस

वाठार निंबाळकर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फलटण तालुक्यात दमदार पावसाची हजेरी लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. तालुक्यात विशेषत: नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात वसनाच्या ८६ गावांत गेली तीन वर्षे शेतकऱ्यांना पावसाअभावी अनेक संकटांचा सामाना करावा लागत होता.  या पावसाबाबत बोलताना ‘तरडफ’चे माजी सरपंच म्हणाले, ‘गेली तीन वर्षे पाऊस नसल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, आता झालेल्या पावसामुळे विहिरींना पाणी फुटून शेती व पिण्याचा प्रश्न मार्गी लागेल.’  -शेरेचीवाडीचे श्रीरंग चव्हाण म्हणाले, ‘शेतीवरच जीवन अवलंबून आहे. पाऊस नसल्याने पीक नाही पैसे नाहीत. त्यामुळे अनंत अडचणी येत होत्या. आता झालेल्या पावसामुळे काही तरी पीक घेऊन पिकाच्या उत्पादनावर उदरनिर्वाह करता येईल.
बाजरीचा हंगाम जरी संपत आला असला तरी अद्याप ज्वारी, जनावरांचा चारा व कडधान्य यासह पालेभाज्यांची लागवड करता येणार आहे. (वार्ताहर)

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
ताथवडा ते ठाकूरकी, तावडी ते दरेवाडी, वेळोशी, मिरढे, आदंरुढ या पट्ट्यामध्ये जवळपास सर्वच गावांमध्ये पाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, टँकरने मिळणारे अल्प व मर्यादित पाणी त्यामुळे उर्वरित पाण्याच्या गरजेसाठी पाच-सहा किलोमीटर अंतरावर कुठे तरी असणाऱ्या ५० ते ५५ फूट खोल विहिरीमधून घागरीने पाणी बाहेर काढून पाण्याची गरज पूर्ण करावी लागत होती. गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

Web Title: After three years, Fattan received heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.