शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’!, निवडणुकीत ‘भाजप’ला बंडखोरीचा धोका

By सचिन काकडे | Updated: November 12, 2025 17:16 IST

Local Body Election: अनेक उमेदवारांच्या पुढे दुहेरी संकट

सचिन काकडेसातारा : साताऱ्याच्या राजकारणात ‘मनोमिलन’ यशस्वी झाले असले तरी, आगामी पालिका निवडणुकीत भाजपसमोर ‘बंडखोरी’ चे मोठे संकट उभे ठाकले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एकत्र येण्यानंतर पालिकेच्या ५० जागांसाठी तब्बल ५०० हून अधिक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केल्याने, भाजपपुढे उमेदवार निवडीचा मोठा पेच आहे. या बंडखोरीमुळे पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’ असा सामना रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.पालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सोमवारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी रीतसर मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, रात्री उशिरा उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ‘गुफ्तगू’ केले.यानंतर आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही दोन्ही राजे उपस्थित होते. या बैठकीत ‘कोणत्या शिलेदाराला लॉटरी’ आणि ‘कोणाला बाजूला ठेवायचे’ यावर विचारमंथन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारांची संख्यापाहता भाजपला गमिनी काव्याने उमेदवारांची निवड करावी लागणार असल्याने कोणाला लॉटरी लागणार आणि कोणाला नाही? यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.अनेक उमेदवारांच्या पुढे दुहेरी संकटदोन राजेंच्या जुन्या-नव्या निष्ठावंतांनी गेल्या चार वर्षांत प्रभागात ‘स्वतंत्र व्होट बँक’ तयार केली आहे. क्षमता असूनही जर उमेदवारी नाकारली गेली तर हे नाराज शिलेदार शांत बसणार नाहीत. ते थेट महाविकास आघाडीच्या छावणीत प्रवेश करून राजेंच्या विरोधात ‘राजकीय ताकद’ दाखवू शकता. महाविकास आघाडीने देखील गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, नाराज बंडखोर उमेदवार महाविकास आघाडीची ताकद ठरू शकतात.जागा वाटपाचा फॉर्म्युला...सातारा पालिकेची निवडणूक सातारा विकास आणि नगर विकास आघाड्यांमार्फत होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे दोन आघाड्या, मूळ भाजप आणि शिंदे सेना यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा जुळवायचा, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. येत्या दोन-तीन दिवसांत राजकीय समीकरणे बदलणार असून, बंडखोरीचे हे वादळ साताऱ्यात कोणाला धक्का देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.