शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर धोम-बलकवडी धरणग्रस्तांचे आमरण उपोषण स्थगित 

By दीपक शिंदे | Updated: March 18, 2023 14:28 IST

गुरुवार, दि. १६ पासून फलटण तालुक्यातील पुनर्वसित गोळेवाडी (ठाकुरकी) येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते.

फलटण : बलकवडी प्रकल्पग्रस्थांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी धोम-बलकवडी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने गुरुवार, दि. १६ पासून फलटण तालुक्यातील पुनर्वसित गोळेवाडी,(ठाकुरकी) येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संपत कळंबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.पुनर्वसित गावांना महसुली दर्जा देणे, पुनर्वसित गावठाणातील सातबारा वरील मूळ स्थानिकांचे नाव कमी करून संबंधित पुनर्वसित गावाचे नाव दाखल करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या जमिनीचे नकाशे फेर करून मिळावे, त्यांच्या प्रति कब्जेपट्टी सह मिळाव्यात, सातबारा खाते निहाय विभक्त करून मिळावे, दळणवळण व जाण्या-येण्यासाठीचे रस्ते करण्यात यावेत, वहिवाटीचे अडथळे दूर व्हावेत, वाटप जमीन प्रकरणात मूळ मालक यांचेकडून शासनाकडे दाखल प्रकरणासाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना प्रतिवादी न करता शासन यंत्रणेला करावे, या आणि अशा १९ मागण्यांसंदर्भात आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले होते.वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी फोन वरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संपर्क साधत दिनांक २९ मार्च रोजी मागण्या संदर्भात विशेष सभेचे आयोजन केले असल्याचे पत्र दिले. यावेळी वाईचे तहसीलदार वैभव पवार हे उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांनी धरणग्रस्त संघटनेची मिटिंग दि. २९ रोजी घेण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे. तर फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव तसेच खंडाळा तहसीलदार यांच्या वतीने दि. २३ मार्च रोजी मागण्यासंदर्भात मिटिंग घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.धोम-बलकवडी धरणग्रस्त पुनर्वसित संघटना यांच्या आंदोलनास फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन कांबळे, वाखरीचे सरपंच तुकाराम शिंदे, उपअभियंता धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई संजय खांडेकर ताकवले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी उपोषण स्थळी भेट दिली.फलटण शहर पोलिस प्रशासनाच्या वतीने उपोषणस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. उळूब (फरांदवाडी ), गोळेवाडी (वाठार -निंबाळकर ) गोळेगाव (ठाकुरकी ) जोरगाव (कुरवली खुर्द ) जोर (वाखरी ) ता. फलटण, गोळेगाव (लोणंद, ता. खंडाळा ), आदी पुनर्वसित गावातील नागरिक उपोषणात सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन