धरणक्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर पाणी सोडू
By Admin | Updated: June 30, 2017 13:12 IST2017-06-30T13:12:48+5:302017-06-30T13:12:48+5:30
प्रकल्पाच्या कामाची निविदा : ह्यनीरा देवघरह्ण कार्यकार्री अभियंत्यांची माहिती

धरणक्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर पाणी सोडू
आॅनलाईन लोकमत
शिरवळ , दि. ३0 : धरणक्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन ५-६ दिवसांमध्ये पाणी देण्यात येणार आहे. नीरा देवघर प्रकल्पाच्या वितरिकांच्या कामाची निविदा काढण्यात आली असून कायदेशीरबाबी पूर्ण करून लवकरात लवकरात लवकर नीरा-देवघर प्रकल्पाच्या वितरिकांची कामे पूर्ण करण्यात येतील,ह्ण अशी माहिती नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांनी दिली.
खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठान व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे, पोपटराव पवार, हेमंत चव्हाण, रामदास हाके, धनाजी पवार, बाळासाहेब पिसाळ, अशोक धायगुडे, भीमराव शिंदे, जितेंद्र चव्हाण, धनाजी चव्हाण आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांना लाभक्षेत्रातील धनगरवाडी, पिसाळवाडी, भोळी, लोणी, भादवडे, मोर्वे, वाघोशी, अंदोरी, शेडगेवाडी, दापकेघर, कराडवाडी या ग्रामपंचायतींनीही निवेदन दिले.
यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की, लवकरात लवकर कालव्यांचे आवर्तन सोडण्यात यावे. लाभक्षेत्रातील गावांच्या ओढे, नाल्यामध्ये पाणी सोडण्यासाठी दारे बसविण्यात यावीत. त्याद्वारे गावामधील बंधारे भरण्यात यावेत. वितरिकांची कामे लवकरात लवकर सुरु करून पूर्ण करीत गावडेवाडी, शेखमिरवाडी व वाघोशी उपसा जलसिंचनाची कामे कामे पूर्ण करण्यात यावीत.