शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मुलीची प्रसूती घरीच करून अर्भकाचे शिर केले धडावेगळे, पीडित मुलीच्या बापाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:32 IST

अत्याचार करणाराही गजाआड

कऱ्हाड (जि. सातारा) : अत्याचारानंतर साडेआठ महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीची घरीच प्रसूती करून जन्मलेल्या बाळाचे शिर धडावेगळे करीत ते नाल्यामध्ये टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला ताब्यात घेऊन अटक केली, तर मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्याही मुसक्या आवळल्या.  

ढेबेवाडी भागातील एका गावातील अठरा वर्षीय मुलीला ३ मार्च रोजी अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी मुलगी ८ महिने २१ दिवसांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. मात्र, याबाबतची कसलीही माहिती पोलिस ठाण्यात न देता आई, वडील मुलीला घेऊन घरी गेले. त्याचदिवशी दुपारी अचानक मुलीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यावेळी आई व वडिलांनी घरातच प्रसूती केली. जन्म झाल्यानंतर अर्भक रडू लागले. 

शेजाऱ्यांना समजायला नको म्हणून मुलीच्या वडिलांनी त्या अर्भकाचे तोंड दाबून घरातील पारळीने त्याचे शिर धडावेगळे केले. तसेच शिर आणि धड पिशवीतून निर्जनस्थळी नेऊन नाल्यामध्ये टाकले. अर्भक टाकून दिल्यानंतर पीडित मुलीला घेऊन तिचे आई-वडील सांगलीला निघाले होते. मात्र, मुलगी गर्भवती असल्याची माहिती पोलिस ठाण्यात समजल्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. मुलीकडे पोलिसांनी विचारणा केली असता, तिने अत्याचार करणाऱ्याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला अटक केले. दरम्यान, या घटनेबाबत कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. 

...असा झाला घटनेचा खुलासा!अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर मुलगी गर्भवती आहे, असे समजून पोलिस वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुलीला घेऊन कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात गेले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मात्र, मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे आढळले. त्यामुळे चक्रावलेल्या पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन गर्भाबाबत विचारणा केली असता, प्रसूती झाल्याचे सांगून वडिलांनी त्या अर्भकाचे शिर धडावेगळे करीत ते नाल्यात टाकून दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी