शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

वडिलांच्या जागी असलेला थोरला भाऊ गेला; विरहात धाकट्यानंही प्राण सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:53 PM

वडिलांप्रमाणे प्रेम केलेल्या सुखदु:खात सहभागी झालेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. काळजावर दगड ठेवून मोठ्या भावाचे सर्व कार्य पार केले. त्यानंतर रात्री मुंबईला गेले पण विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का आला अन् लहान भावानेही या जगाचा निरोप घेतला. हृदयद्रावक ही घटना जावळी तालुक्यातील पिंपळी येथे घडली.

ठळक मुद्देमोठ्या भावाच्या मृत्यूनंतर लहान भावानेही घेतला जगाचा निरोपविरह असह्य : सर्व विधी उरकून मुंबईला गेल्यानंतर हृदयविकाराचा धक्का

दिलीप पाडळेपाचगणी : वडिलांप्रमाणे प्रेम केलेल्या सुखदु:खात सहभागी झालेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. काळजावर दगड ठेवून मोठ्या भावाचे सर्व कार्य पार केले. त्यानंतर रात्री मुंबईला गेले पण विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का आला अन् लहान भावानेही या जगाचा निरोप घेतला. हृदयद्रावक ही घटना जावळी तालुक्यातील पिंपळी येथे घडली.पिंगळीमध्ये पवार कुुटुंबात चार भावंडे पण एकत्र कुटुंबपध्दत त्यामुळे सर्व कसं आनंदात चाललं होतं. मोठे भाऊ विठ्ठल पवार हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. ते गावीच राहत होते. कुटुंबात त्यांचा शब्द अंतिम असे. इतर भाऊ त्यांचा अंतिम मानत होते. एकमेकांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करत. दु:खात सहभागी होत होते.

पिंपळी येथे सोमवार, दि. ५ माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल महादेव पवार (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने घरात एक निर्वात पोकळी तयार झाली होती. हीच बाब कुटुंबियांच्या मनात घर करून राहिली होती.

दादाच्या निधनानंतर त्याचे मुंबईला वास्तव्यास असणारे तृतीय बंधू सुभाष गावी आले होते. सर्व विधी उरकून ते बुधवार, दि. ७ रोजी सुभाष पुन्हा मुंबईला निघून गेले. मात्र गुरुवार, दि. ८ रोजी रात्री त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा प्रयत्न कुटुंबीय व शेजाऱ्यानी केला पण त्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. आणि सुभाषने जग सोडलं.दादापाठोपाठ लहान्यावरही अंत्यसंस्कारदादांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानेचं यांच्यावरही काळाने घाला घातला. निष्ठुर काळाने नानाची सुभाष नानाच्या जीवनाची दोरी ओढली आणि पवार कटुंबियांवर दु:खाचा आघात केला. ज्या स्मशानभूमीत मोठ्या भावावर अंत्यसंसकार करण्यात आले. तिथंच काही दिवसांत सुभाषवर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीय, नातेवाईकांबरोबरच ग्रामस्थांचे मन हेलावून होते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर