१८ तासांनंतर रेल्वे रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:58 IST2016-03-13T00:54:09+5:302016-03-13T00:58:56+5:30

आदर्की-सालपे : ३०० कर्मचाऱ्यांकडून दिवस-रात्र काम

After 18 hours on the railway track | १८ तासांनंतर रेल्वे रुळावर

१८ तासांनंतर रेल्वे रुळावर

आदर्की : मिरज-पुणे लोहमार्गावरील आदर्की-सालपे दरम्यान पुण्याकडे साखर घेऊन निघालेल्या मालगाडीचे दोन डबे शुक्रवारी दुपारी अडीच्या सुमारास घसरले होते. या घटनेनंतर सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी १८ तास काम करून लोहमार्ग पूर्ववत केला. यानंतर शनिवारी सकाळी १०.३० वाजता पहिली अजमेर एक्स्प्रेस गाडी रुळावरून धावली.
आदर्की-सालपे दरम्यान शुक्रवारी मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले होते. सुमारे आठशे मीटरचा लोहमार्ग, रुळ, सिल्पर तुटल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. या घटनेनंतर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता लोहमार्ग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पुणे व मिरज येथे सुमारे ३०० कर्मचारी व क्रेनच्या साह्याने तब्बल १८ तास हे काम सुरू होते. शनिवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर अजमेर एक्स्प्रेस गाडी रुळावरून धावली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. (वार्ताहर)

Web Title: After 18 hours on the railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.