ॲड. मुकुंद सारडा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST2021-07-07T04:49:05+5:302021-07-07T04:49:05+5:30

जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक तसेच विद्यमान अध्यक्ष ...

Adv. Mukund Sarda passed away | ॲड. मुकुंद सारडा यांचे निधन

ॲड. मुकुंद सारडा यांचे निधन

जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक तसेच विद्यमान अध्यक्ष होते. जिल्ह्यातील वकीली क्षेत्रात त्यांचा फाम मोठा दबदबा होता. कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह सातारा शहरातील आजी माजी नगरसेवक, विधीज्ञ, व्यापारी, पक्षकार, पत्रकार तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

संगम माहुली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद सारडा, जनता बँकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, राजेंद्र लावंगारे, सलीम कच्छी, धीरज कासट, विधीज्ञ संग्राम मुंढेकर आदींनी आदरांजली वाहिली.

फोटो : ॲड. मुकुंद सारडा

Web Title: Adv. Mukund Sarda passed away