प्रशासनाने व्यवसायाला परवानगी द्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:47 IST2021-07-07T04:47:56+5:302021-07-07T04:47:56+5:30
याबाबत मनसेच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, ...

प्रशासनाने व्यवसायाला परवानगी द्यावी!
याबाबत मनसेच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, शहराध्यक्ष सागर बर्गे, नितीन महाडिक, रोहित मोरे, विनायक भोसले, चंद्रकांत गायकवाड, अमोल हरदास, झुंझार यादव, उत्तम बागल, दत्तात्रय दुपटे व कार्यकर्ते उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय व उद्योगधंदे बंद असल्याने गोरगरीब व सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांना वीजबिल, कर्जाचे हप्ते, दुकान भाडे द्यावे लागत आहे. त्यातच महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व परिस्थितीचा विचार करून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन व्यपार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
फोटो : ०६केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना मनसेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.