गोरगरिबांच्या जेवणाची प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी : वायदंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST2021-06-04T04:30:13+5:302021-06-04T04:30:13+5:30
सातारा : शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेची उपासमार सुरू आहे. हातावर पोट असलेले लोक कामानिमित्त घराबाहेर पडले तर प्रशासन ...

गोरगरिबांच्या जेवणाची प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी : वायदंडे
सातारा : शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेची उपासमार सुरू आहे. हातावर पोट असलेले लोक कामानिमित्त घराबाहेर पडले तर प्रशासन त्यांना मारझोड करत आहे. जनता प्रशासनाला सहकार्य करते आहे, मात्र त्यांना उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने गरीब जनतेच्या दोन वेळच्या भोजनाची सोय करावी, अन्यथा असहकार आंदोलन सुरू करू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वायदंडे यांनी दिला आहे.
कोरोना महामारी रोखण्यासाठी गेल्या महिन्यापासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला. इतर जिल्ह्यांनी नियमांमध्ये शिथिलता आणली; परंतु सातारा जिल्ह्यात कडक संचारबंदी ठेवण्यात आलेले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद असल्याने घरी गेले त्याचे उपासमार होत आहे. जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता आणावी किंवा गोरगरीब जनतेला दोन वेळचे अन्न द्यावे, असे आवाहन केले आहे. सचिन वायदंडे आणि तालुकाध्यक्ष आप्पा तुपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.