शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ 

By नितीन काळेल | Updated: May 2, 2024 18:35 IST

जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज : ४६५ बसेस अन् दोन बोटही उपलब्ध 

सातारा : सातारा लोकसभा निवडणूक मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी मतदानयंत्रेही सुस्थितीत तयार करुन ठेवण्यात आली आहेत. तर या निवडणुकीसाठी ११ हजार १५५ मनुष्यबळ नियुक्त केले आहे. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दोनवेळा देण्यात आले आहे. तसेच मतदान कर्मचाऱ्यांसाठी ४६५ बसेस आणि दोन बोटही उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मंगळवार, दि. ७ मे रोजी होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा लोकसभा अंतर्गत विधानसभेच्या सहा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून ५ हजार ६५४ बॅलेट युनिट, ३ हजार ३३९ कंट्रोल युनिट व ३ हजार ४३१ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत. यांची मतदानासाठी कमिशनिंगही झाली आहे. त्यामुळे सर्व मतदान यंत्रे मतदानासाठी सुस्थितीत तयार आहेत.या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मिनी बस ३९, एसटी ४२६ देण्यात येणार आहेत. तर दुर्गम मतदान केंद्रासाठी दोन बोट देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीमध्ये आवश्यक असणारे सर्व साहित्य विविध शासकीय मुद्रणालयांकडून प्राप्त झालेले आहे. दुर्गम ३१ मतदान केंद्राच्या ठिकाणी संपर्क होण्यासाठी वॉकीटॉकी आणि रनर या मार्गाने संपर्क करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

लोकसभा निवडणूक कामकाजासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या अनुषंगाने ११ हजार १५५ इतके मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना इव्हीएम मशिन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच निवडणूक कामकाजाबाबत आवश्यक ते सर्व प्रशिक्षण दोनवेळा देण्यात आले असून तिसरे प्रशिक्षण ६ मे रोजी प्रस्तावित आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४collectorजिल्हाधिकारी