शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात प्रशासन अलर्ट! ३६९ कुटुंबांचे स्थलांतर; पश्चिमेकडील गावांत सतर्कता, NDRFची टीम येणार

By नितीन काळेल | Updated: July 20, 2023 19:43 IST

अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दरडप्रवण भागातील ३६९ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे.

सातारा: अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दरडप्रवण भागातील ३६९ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे. साताऱ्यासह वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या पश्चिमेकडील तालुक्यातील हे नागरिक आहेत. त्यांना शाळा, निवारा शेड, मंदिरात हलिवण्यात आले असून अन्न, शुध्द पाण्यासह महत्वाच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच दोन दिवसांत जिल्ह्यात एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच पुढील पाच दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून सूचना केली. यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी रस्ते खचत असून पूल वाहून जात आहेत. दरडी कोसळू लागल्याने प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन संवेदनशील ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करावे अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनीही पाटण तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन आढावा घेतलेला आहे. तसेच तेथील अधिकाऱ्यांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे.

या पार्श्वभूमिवर सध्या जिल्हा प्रशासनाने धोकादायक गावातील कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम भागातील पाच तालुक्यातील दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. गुरुवारी स्थलांतरित कुटुंबीयांचा आकडा ३६९ झाला होता. यामध्ये पुढे आणखी वाढ होणार आहे.

स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती...

  • सातारा तालुका : मोरेवाडीतील १८, सांडवालीतील २० आणि भैरवगडमधील ६० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
  • जावळी तालुका : बोंडारवाडी ६, भुतेघर येथील ३ कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. तसेच नरफदेव, रांजणी आणि धनगरपेढामधील नागरिकांना स्थलांरित होण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे.
  • वाई तालुका : जोर गाव ८, गोळेगाव-गोळेवस्ती येथील ४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे.
  • पाटण तालुका : मिरगाव, हुंबरळी आणि ढोकावळे येथील १५० कुटुंबाचे तर म्हारवंडमधील ३५ कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.
  • महाबळेश्वर तालुका : माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे येथील ६५ कुटुंबे स्थलांतरित

जिल्ह्यात धोकादायक दरडप्रवण ४१ गावे...

  • महाबळेश्वर तालुका : येरणे बुद्रुक, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, येर्णे खुर्द, शिंदोळा, एरंडल, धावली, दुधोशी, भेकवलीवाडी, आचली, कुमठे (कामटवाडी)
  • पाटण तालुका : आंबेघर तर्फ मरळी खालचे, आंबेघर तर्फ मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहीर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी (धावडे), जितकरवाडी (जिंती), धनवडेवाडी/शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), बागलेवाडी, जुगाईवाडी, कुसावडे (पळसरी).
  • वाई तालुका : कोंढावळे, जोर.
  • जावळी तालुका : बोंडापरवाडी, भुतेघर, वहिटे.
  • सातारा तालुका : सांडवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी)

जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमिवर दरडप्रवण भागातील लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेले आहे. त्यांना अन्न, पाणी तसेच आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. सध्या पाऊस होत असल्याने दरडप्रवण भागात नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच प्रशासनासही सहकार्य करावे. लवकरच एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारीst जितेंद्र डुडी यांनी दिली. 

टॅग्स :satara-acसाताराRainपाऊस