एकजुटीने कऱ्हाडच्या लौकिकात भर घालावी

By Admin | Updated: March 23, 2015 00:46 IST2015-03-22T22:44:25+5:302015-03-23T00:46:14+5:30

शांतता कमिटीच्या बैठकीत चव्हाण यांचे आवाहन

Add to your homogeneous homogeneity | एकजुटीने कऱ्हाडच्या लौकिकात भर घालावी

एकजुटीने कऱ्हाडच्या लौकिकात भर घालावी

कऱ्हाड : ‘संवेदनशील शहर म्हणून निर्माण झालेली कऱ्हाडची ओळख आपल्याला पुसायची आहे. सर्वांनी एकजुटीने राहून शहराच्या नावलौकिकात भर घालणे गरजेचे आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड शहर पोलिसांच्या वतीने अर्बन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, भाजपाचे भरत पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंंदे यांच्यासह नागरिक, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘यापूर्वी झालेल्या काही दुर्देवी घटनांमुळे कऱ्हाडची ओळख संवेदनशील शहर अशी झाली आहे. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामध्ये नागरिकांचा मोठा वाटा आहे. कऱ्हाडचा नावलौकिक वाढून शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी आपण मुख्यमंत्री म्हणून कोट्यवधींचा निधी दिला आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या नावलौकिकाला गालबोट लागू नये, असा सर्वांचाच प्रयत्न असला पाहिजे.’
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘ज्या घटनेच्या अनुषंगाने ही शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे, त्या उंब्रजकरांचे मनोगत विचारात घेणे आवश्यक आहे.’
प्रारंभी डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘कऱ्हाडने देशाला तसेच राज्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे,’ असे सांगितले. आमदार आनंदराव पाटील, फारुख पटवेकर, विनायक पावसकर, मजहर कागदी, नितीन काशीद, आनंदराव लादे, अप्पा गायकवाड, शिल्पा वाळिंबे, मुुकुंद कुलकर्णी, हणमंतराव पवार, सागर बर्गे यावेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Add to your homogeneous homogeneity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.