शिकारीच्या चौकशीसाठी कार्यकर्ते ‘तरस’ले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 21:23 IST2017-07-29T21:19:40+5:302017-07-29T21:23:41+5:30
फलटण : फलटण तालुक्यात वनविभागाच्या मनमानी कारभारामुळे वृक्षतोड वाढण्याबरोबरच तरसाची शिकार करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

शिकारीच्या चौकशीसाठी कार्यकर्ते ‘तरस’ले!
फलटण : फलटण तालुक्यात वनविभागाच्या मनमानी कारभारामुळे वृक्षतोड वाढण्याबरोबरच तरसाची शिकार करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. माहिती देऊनही शिकार झाल्याने अद्यापही संबंधितांविरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही. तसेच शिकार प्रकरणाची चौकशीही सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, जनतेतून होत आहे.
नागपंचमीला शिकार करण्याची प्रथा पूर्वी अनेक भागात होती. काळाच्या ओघात तसेच वन्यजीवच्या संरक्षण कायद्यामुळे शिकारीचे प्रमाण कमी झाले असले तरी वनविभागाने सावध राहण्याची नितांत गरज होती. फलटण तालुक्यातही काहीजण शिकार करीत असतात. शिकाºयांना प्राणी कोणत्या भागात आहेत, याची माहिती लागलेली असते.
यावर्षी नागपंचमीला शिकारीच्या शक्यतेबाबत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅण्ड रिसर्च सोसायटीने अगोदरच माहिती दिली होती. त्या पद्धतीने वनाधिकाºयांनी पूर्वतयारीने सावधानता बाळगून शिकाºयांवर पाळत ठेवणे गरजेचे होते. तसेच बंदोबस्तात वाढ करणे आवश्यक होते. शासनाने चांगल्या प्रतीच्या गाड्याही अधिकाºयांना दिल्या आहेत. मात्र, वनविभाग व अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने विंचुर्णी, ता. फलटणच्या डोंगराळ भागात नागपंचमीला तरसाची शिकार झाली. या तरसाचे मारून मारून हाल करण्यात आले. नंतर शिकारी पसार झाले. याबाबतची माहिती सर्वांना देऊन शिकाºयांवर कारवाई करण्याची गरज होती. मात्र, हे प्रकरण दडपण्याचाच अधिकाºयांनी प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिकारीची माहिती ग्रामस्थांना मिळाली नाही. ग्रामस्थांच्या सहकार्याने शिकाºयांना पकडता आले असते.
गुपचूप शिकार करण्याचे काम...
फलटण तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या आहे. त्यामुळे शिकारीही या भागात लक्ष ठेवून असतात. अनेकवेळा गुपचूप शिकार केली जाते. मात्र, त्याचा पत्ता लागत नाही. असाच प्रकार तरसाच्या शिकारीच्या बाबतीत घडला असता. आता ही घटना उघडकीस आल्याने वनविभागाचा कारभार संशयात सापडला आहे. तालुक्यात वृक्षतोड, जनावरांची अवैध वाहतूक होते. या घटना वाढूनही वनविभाग लक्ष देत नाही. आतातरी संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मुळातच दुर्मीळ होत असणाºया तरस या प्राण्याची शिकार होणे दुर्दैवी आहे. वनविभागाने वेळीच लक्ष दिले असते तर शिकारीचा प्रकार घडला नसता. वनविभागाचा कारभार रामभरोसे असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी.
- विक्रम चोरमले,
सामाजिक कार्यकर्ते