विलगीकरण कक्षाचा उपक्रम दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST2021-06-10T04:26:24+5:302021-06-10T04:26:24+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यातून गावाला बाहेर काढण्यासाठी ...

Activation Direction of Separation Cell | विलगीकरण कक्षाचा उपक्रम दिशादर्शक

विलगीकरण कक्षाचा उपक्रम दिशादर्शक

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यातून गावाला बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने गावासाठी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. विलगीकरण कक्षाचा हा उपक्रम इतरांना दिशादर्शक ठरेल, असे मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.

कोरोनाविरूद्धचा लढा आणखी मजबूत करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने अहिरे ग्रामपंचायत व व्यवस्थापन समितीने प्राथमिक शाळेत स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षास भेट देऊन आमदार मकरंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, सरपंच रवींद्र सोनावणे, उपसरपंच दयानंद धायगुडे, युवा उद्योजक नितीन ओव्हाळ, ग्रामसेवक मल्हारी शेळके व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

या सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, औषधोपचार तसेच गावात केलेल्या उपाययोजना याचा आढावा त्यांनी घेतला. तसेच येथे उपलब्ध केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे लोकार्पण केले. लोकांच्या आरोग्यासाठी मैदानात उतरून उचललेले पाऊल निश्चितच आदर्शवत असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे कौतुक केले.

फोटो : ०९ खंडाळा

खंडाळा तालुक्यातील अहिरे येथील विलगीकरण कक्षाला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन येथील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Web Title: Activation Direction of Separation Cell