एकाच जुगार अड्ड्यावर सलग दोन दिवस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:48+5:302021-09-23T04:44:48+5:30

सातारा: एकदा कारवाई झाल्यानंतर अवैध व्यवसाय बंद होतो, असे बोलले जाते, पण चक्क एकदा कारवाई करूही परत दुसऱ्या दिवशी ...

Action for two days in a row at the same gambling den | एकाच जुगार अड्ड्यावर सलग दोन दिवस कारवाई

एकाच जुगार अड्ड्यावर सलग दोन दिवस कारवाई

सातारा: एकदा कारवाई झाल्यानंतर अवैध व्यवसाय बंद होतो, असे बोलले जाते, पण चक्क एकदा कारवाई करूही परत दुसऱ्या दिवशी पोलिसांना कारवाई करावी लागते, याचे आश्चर्य व्यक्त होतेय. शेंद्रे येथे सलग दोन दिवस पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौघांवर गुन्हा केला.

पोलिसांकडून वारंवार जुगार अड्ड्यावर कारवाई होत असतात. मात्र, तरीही जुगार अड्डे बिनदिक्कत सुरू असतात. याचाच नमुना शेंद्रे येथे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पाहायला मिळाला. शेंद्रे येथील एका पान टपरीच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. या ठिकाणी आदल्या दिवशी पोलिसांनी दोघांवर कारवाई करून, एक हजार रुपयांची रोकड व साहित्य जप्त केले. त्यानंतर, हा जुगार अड्डा बंद होणे अपेक्षित होते. मात्र, दुसऱ्या दिवशीही हा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पुन्हा तेथे पोहोचले. परत पोलिसांनी या अड्ड्यावर कारवाई केली. यावेळीही पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. सलग दोन दिवस एकाच ठिकाणी कारवाई केल्याची बहुदा ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

रमेश दिनकर जावळे (वय ४८ रा.कामाठीपुरा सातारा), संतोष कृष्णा जाधव (रा.शेंद्रे, ता.सातारा), प्रवीण वसंत वाघमारे (वय ४०, रा.शेंद्रे, ता.सातारा), समीर उर्फ शशीम सलीम कच्ची (रा.सैदापूर, ता.सातारा) यांच्यावर पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर सापडल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

Web Title: Action for two days in a row at the same gambling den