वाळू तस्करावर पुसेगाव तलाठ्याची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST2021-02-12T04:37:04+5:302021-02-12T04:37:04+5:30

पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) चे तलाठी गणेश बोबडे यांनी शुक्रवारी (दि. ५) रात्री दीडच्या सुमारास येरळा नदीतून वाळूची ...

Action of Pusegaon Talatha on sand smuggling | वाळू तस्करावर पुसेगाव तलाठ्याची कारवाई

वाळू तस्करावर पुसेगाव तलाठ्याची कारवाई

पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) चे तलाठी गणेश बोबडे यांनी शुक्रवारी (दि. ५) रात्री दीडच्या सुमारास येरळा नदीतून वाळूची तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टरला जरंबी(राजापूर) या ठिकाणी पकडले. हा ट्रॅक्टर पुसेगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अजित शिवाजी घनवट (रा. राजापूर ता. खटाव) याच्याविरुद्ध महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

खटाव तालुका उत्तर भागातील येरळा नदी पात्रातील वाळू साठ्याचा अधिकृत लिलाव झालेला नाही. असे असतानाही या भागातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. त्यानंतर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार किरण जमदाडे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास तलाठी बोबडे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले असता त्यांनी ही कारवाई जरंबी (राजापूर) येथे केली. महसूल प्रशासनाने केलेल्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत असून वाळू तस्करांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.

दरम्यान, काटेवाडी परिसरातील येरळा नदी पात्रातून वाळू चोरीला आळा घालण्यासाठी पुसेगावचे तलाठी गणेश बोबडे यांनी शक्कल लढवली असून, नदीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जेसीबी मशीनने चर खोदली आहे. यामुळे कोणतेही वाहन नदीपत्राकडे जाऊ शकत नसल्याने सध्या या ठिकाणी वाळूचोरी थांबली आहे.

(कोट)

तालुक्यात महसूल प्रशासन निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याचा फायदा वाळू तस्कर घेत होते. सध्या वाळूचोरी रोखण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेल्या यंत्रसामग्रीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात येतील.

-किरण जमदाडे, तहसीलदार, खटाव (वडूज)

फोटो : पुसेगाव (ता. खटाव) कारवाई दरम्यान पकडलेल्या ट्रॅक्टर सोबत तलाठी गणेश बोबडे.

Web Title: Action of Pusegaon Talatha on sand smuggling