वरातीत नाचण्यावरून दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:54:27+5:302014-06-08T00:54:38+5:30

दोन जखमी : अंबवडे (सं.) वाघोलीतील बारा अटकेत

Action between two groups in Dancing Harvest | वरातीत नाचण्यावरून दोन गटांत हाणामारी

वरातीत नाचण्यावरून दोन गटांत हाणामारी

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील अंबवडे सं. वाघोली येथे आज, शनिवारी पहाटे लग्नाच्या वरातीत नाचल्याच्या कारणावरून गावातील दोन गटांत हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात फिर्यादी दाखल केल्यानंतर वाठार पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे.
अंबवडे येथे काल, शुक्रवारी विवाह होता. यानतंर मध्यरात्री वरात सुरू झाली. वरात गावातील ग्रामपंचायत चौकात आल्यानंतर गावातील दोन गटांत वादावादी झाली आणि याचवेळी लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी हाणामारी सुरू झाली. यात दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अनुभव दादासो घाडगे यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार राहुल धर्माजी सकुंडे, विक्रम मुकिंदा सकुंडे, नयन सकुंडे, विनोद सकुंडे, अमित सकुंडे, सोन्या सकुंडे, धीरज सकुंडे यांच्याविरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नयन सोनबा सकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन सकुंडे, संदीप सकुंडे, रूपेश सकुंडे, वैभव सकुंडे, सागर सकुंडे, प्रशांत सकुंडे, अनुभव घाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण १२ जणांना अटक केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार एन. एन. शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Action between two groups in Dancing Harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.