विनापरवाना आपट्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST2021-07-02T04:27:06+5:302021-07-02T04:27:06+5:30
वाई : आपट्याच्या पानांची विनापरवाना वाहतूक करता असताना वनविभागाने कारवाई केली. यामध्ये वाहनांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

विनापरवाना आपट्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
वाई : आपट्याच्या पानांची विनापरवाना वाहतूक करता असताना वनविभागाने कारवाई केली. यामध्ये वाहनांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी की, पाचगणी ते वाई रस्त्याने वाई वनपरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी बुधवार दि. ३० रोजी सायंकाळी साडेसात वाजता रस्ता गस्त करीत असताना एका टेम्पोचा संशय आला. संबंधित टेम्पोचा पाठलाग करून नागेवाडी फाटा येथे वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली असता, टेम्पोमधील पोत्यामध्ये आपट्याची पाने मिळून आली. टेम्पोचालक आरोपी मेहमुदखान रहिमखान पठाण व अयुबखान बशीरखान पठाण (दोघे रा. जलालपुरा, जांभबुसर भरुच, गुजरात) यांच्याकडे वाहतूक पास नसल्याने आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर नोंद करण्यात आला आहे. टेम्पोसह आपट्याच्या पानांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कारवाई उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते,
सहायक वनसंरक्षक (वनीकरण), सातारा सचिन डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वाई महेश झांजुर्णे, वनरक्षक वैभव शिंदे, वनरक्षक सुरेश सूर्यवंशी यांनी केली.