विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST2021-05-24T04:38:11+5:302021-05-24T04:38:11+5:30

वाई : वाई ते सुरुर वाई या मार्गावर वाई वनपरिक्षेत्रात विनापरवाना लाकूड वाहतुकीवर कारवाई करून लाकूड व टेम्पोसह सव्वातीन ...

Action against unlicensed timber smugglers | विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

वाई : वाई ते सुरुर वाई या मार्गावर वाई वनपरिक्षेत्रात विनापरवाना लाकूड वाहतुकीवर कारवाई करून लाकूड व टेम्पोसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाई वनपरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी शनिवारी (दि. २२) वाई ते सुरुर रस्त्याने गस्त घालत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहाबाग गावचे हद्दीत टेम्पो (एमएच ११ एम ५१०३) या वाहनाची तपासणी केली असता. या वाहनात आंबा, लिंब, रामफळ, चिंच, उंबर आदी जातीचा लाकूड विनापरवाना वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. टेम्पोचालक आरोपी राजेंद्र नाथ्याबा नेवसे (रा. खंडाळा जि. सातारा) याच्याकडे लाकूडमालाचा वाहतूक परवाना आढळून आला नाही. त्याच्यावर गुन्हा नोंद केला असून, टेम्पो, लाकूड मालासह जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्यात लाकूडमाल व टेम्पो मिळून सव्वातीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते, सहायक वनसंरक्षक व्ही. एन. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, वनरक्षक वैभव शिंदे, वसंत गवारी, वनसेवक सुरेश सपकाळ यांनी सहभाग घेतला.

Web Title: Action against unlicensed timber smugglers