सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापना सुरू करण्यास बंदी घातली आहे. तसेच नागरिकांनादेखील विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली असतानाही बाहेर फिरणाऱ्या दहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा शहरातील कमानी हौद परिसरात गस्तीसाठी असलेल्या पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरल्याप्रकरणी स्वराज्य शिवाजी देसाई (रा. शाहूनगर, सातारा), मधुसुदन मल्लीकार्जुन चिफाळे (रा. संकल्प अर्पाटमेंट, सातारा), सचिन मारुती मांढरे (रा. देगाव, सातारा), यश सखाराम मांढरे (रा. जळकेवाडी, ता.सातारा), अभिजित प्रभाकर सोनमळे (रा. गुरुवार पेठ, सातारा), प्रणव सुदाम मोरे (रा. गोडोली, सातारा), मोहसीन सलीम शेख (रा. केसरकर पेठ, सातारा), चंद्रकांत मारुती जाधव (रा. नरहरवाडी, ता.कोरेगाव), अक्षय अशोक आनेकर (रा. गुरुवार पेठ, सातारा), अमित शरद फाळके (रा. ललगुण, ता. खटाव), यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवालदार सचिन किसन पोळ, संतोष कचरे, चेतन ठेपणे यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार बसवंत हे करत आहेत.