विनाकारण फिरणाऱ्या सातजणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST2021-05-22T04:36:00+5:302021-05-22T04:36:00+5:30
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असतानाही वाहनांवरून विनाकारण फिरणाऱ्या सातजणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलिसांनी ...

विनाकारण फिरणाऱ्या सातजणांवर कारवाई
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असतानाही वाहनांवरून विनाकारण फिरणाऱ्या सातजणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सातारा शहरातील बोगदा परिसरात येवतेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर वाहन घेऊन विनाकारण फिरणारे आढळून आले. कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष बरकडे यांनी तक्रार दिली आहे, तर कार्तिक चंद्रकांत नायडू (रा. सातारा) आणि संकेत विजय भोसले यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार गायकवाड हे तपास करीत आहेत.
तसेच शाहूपुरी चौकातही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी हवालदार ओंकार यादव यांनी तक्रार दिली. त्यानुसार प्रकाश वेद (पूर्ण नाव नाही, रा. दिव्यनगरी, सातारा), आशिष अशोक शेलार (रा. अंबेदरे, शाहूपुरी सातारा), अनिकेत पांडुरंग घनवट (रा. शाहूपुरी, सातारा) आणि अन्य एकजणाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.