वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:41 IST2021-05-08T04:41:57+5:302021-05-08T04:41:57+5:30

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असतानाही वाहन फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या तिघाजणांच्या विरोधात सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली. ...

Action against pedestrians | वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई

वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असतानाही वाहन फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या तिघाजणांच्या विरोधात सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कारणाकरिता जाण्या-येण्यासाठी परवानगी आहे. असे असताना काहीजण हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून फिरत असतात. त्यामुळे अशा लोकांविरोधात कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. यातून सातारा शहरातील कमानी हौद परिसरात पोलिसांनी वाहन घेऊन फिरणाऱ्या तिघांवर कारवाई केली. प्रतीक प्रदीप चिटणीस (वय ३१), संभाजी गणपती गुंजाळे (५९, दोघेही रा. मंगळवार पेठ, सातारा) आणि कुलदीप दत्तोबा पवार (३६, रा. भवानी पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस किशोरी निकम यांनी तक्रार दिली आहे. हवालदार कारळे हे तपास करीत आहेत.

....................................................

Web Title: Action against pedestrians