साताऱ्यात जुगार प्रकरणी आठ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST2021-02-21T05:13:41+5:302021-02-21T05:13:41+5:30
सातारा: शहर पोलिसांनी शनिवारी विविध ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ४६ हजार ८९० ...

साताऱ्यात जुगार प्रकरणी आठ जणांवर कारवाई
सातारा: शहर पोलिसांनी शनिवारी विविध ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ४६ हजार ८९० रुपयांचा ऐवज व जुगाराचे साहित्य, सात मोबाईल हस्तगत करण्यात आले.
सूरज राजेंद्र फडतरे (वय २३, रा. रविवार पेठ), मुनिराज किशोर शर्मा (वय ३७, रा. सय्यद कॉलनी, करंजे पेठ, सातारा) , वासीम इक्बाल शेख (रा. शनिवार पेठ, सातारा), भगवान रामचंद्र बनसोडे( वय ४० रा. निलंगा, जिल्हा लातूर सध्या रा. दौलत नगर, सातारा) ,राजेंद्र शशीपाल नहेब (रा. देसाई कॉलनी सदर बझार,) मारुती शामू उबाळे (वय ३०, रा. गणेश कॉलनी दौलतनगर करंजे), अनिल लक्ष्मण रणदिवे (वय ६३ रा. जरंडेश्वर नाका, सदर बझार ), मधुकर रामजी कांबळे (वय ४९, रा. शिवशंभो कॉलनी, दौलत नगर), पवित सतीश तोडगे (वय २६, रविवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४६ हजार ८९० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये जुगाराचे साहित्य पाच मोबाईलचा समावेश आहे.