औद्योगिक वसाहतीतून १९ ऑक्सिजन सिलिंडरचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST2021-05-13T04:40:34+5:302021-05-13T04:40:34+5:30
कोरोना रुग्णांची संख्या सध्या वेगाने वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ५० बेडचे ...

औद्योगिक वसाहतीतून १९ ऑक्सिजन सिलिंडरचे अधिग्रहण
कोरोना रुग्णांची संख्या सध्या वेगाने वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ५० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मान्यवरांच्याहस्ते याचे उद्घाटन झाले आहे. मात्र ऑक्सिजन बेडसाठी ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता होती.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेवरून प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी बुधवारी तासवडे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडील १९ सिलिंडरचे अधिग्रहण केले आहे. .दरम्यान, सदरची ऑक्सिजन सिलिंडर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहातील कोरोना हॉस्पिटलला दिल्याने रुग्णांची सोय होणार आहे.