शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक

By दत्ता यादव | Updated: January 16, 2024 19:17 IST

पोलिसांना पंधरा दिवस दिला गुंगारा

सातारा : पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीला पकडण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सूरज हणमंत साळुंखे (वय २२, सावली, सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलिसांनी सूरज साळुंखे याला ३० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडून चोरीची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. सायंकाळी त्याला न्यायालयातून कारागृहात नेण्यात येत होते. कारागृहासमोर आणल्यानंरत त्याच्या हातातील बेड्या पोलिसांनी सोडल्या. त्यामुळे तो पोलिसांच्या हाताला हिसका मारून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. कारागृहासमोरूनच चोरटा पळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने त्याला पकडण्यासाठी दोन पथके तैनात केली होती. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्याचा शोध घेत होते. दरम्यान, सूरज साळुंखे हा मंगळवारी दुपारी सातारा बस स्थानकात आला असल्याची माहिती हवालदार दादा राजगे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने बस स्थानकात जाऊन त्याला ताब्यात घेतले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक होताच सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

हे दोघे करत होते रात्रंदिवस तपास..सूरज साळुंखे हा सराईत आहे. त्याच्या नावावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. बऱ्याचवेळा तो कारागृहात गेला आहे. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तो चोरी करत असे. असा संशयित आरोपी पळून गेल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यातील हवालदार दादा राजगे, चंद्रकांत माने यांनी रात्रंदिवस तपास केला. रात्री-अपरात्री त्याचे घर, नातेवाईक, गावात जाऊन त्याचा शोध घेतला. तसेच अनेक ठिकाणचे सीसीटीव्हीही त्यांनी तपासले. सतत पाठपुरावा ठेवल्यामुळे संशयित सूरज साळुंखे अखेर त्यांच्या हाती लागला.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस