शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

दरोड्यातील आरोपीला थरारक पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:58 IST

जबरी चोरी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून सोमवारी दुपारी सुरवडी, ता. फलटण येथे पकडले.

ठळक मुद्देदरोड्यातील आरोपीला थरारक पाठलाग करून पकडलेस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बारामतीमध्येही गुन्हे दाखल

सातारा : जबरी चोरी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून सोमवारी दुपारी सुरवडी, ता. फलटण येथे पकडले.सागर उर्फ चिंग्या उर्फ चिंगम शिवा काळे (वय २५, रा. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या दरोड्यातील आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील सोनगाव येथे ११ जुलै २०१९ रोजी रात्री दीडच्या सुमारास कोयत्याचा धाक दाखवून एका घरात सागर काळेने जबरी चोरी केली होती.

यावेळी त्याने घरातील एका महिलेला दांडक्याने मारहाण करत गळ्यातील मंगळसूत्रसह सुमारे २३ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. जबरी चोरीप्रकरणी संशयितावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या जबरी चोरीमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, सुरवडी, ता. फलटण येथील कमिन्स कंपनीच्या पाठीमागे तो आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी टीम तेथे तत्काळ रवाना झाली.

पोलीस आल्याचे पाहून सागर काळेने धूूम ठोकली. परंतु पोलिसांनी एक किलो मीटर अंतर थरारक पाठलाग करत अखेर त्याला पकडले. पोलीस ठाण्यात त्याला आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. लोणंद, फलटण शहर, फलटण ग्रामीण, बारामती, वडगाव निंबाळकर आदी ठिकाणी घरफोडी, चोरी, जबरी चोरीचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचे पुढे आले. अधिक तपासासाठी त्याला सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, मोहन नाचन, संतोष जाधव, प्रवीण कडव, योगेश पोळ आदींनी या कारवाईत भाग घेतला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर