सहा वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST2021-06-24T04:26:36+5:302021-06-24T04:26:36+5:30

पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) पोलीस ठाणे हद्दीतील करंजओढा (बुध) येथे २०१५ च्या स्वातंत्र्यदिनी दिवसाढवळ्या दुहेरी खून करून फरार ...

Accused absconding for six years in police custody | सहा वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सहा वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) पोलीस ठाणे हद्दीतील करंजओढा (बुध) येथे २०१५ च्या स्वातंत्र्यदिनी दिवसाढवळ्या दुहेरी खून करून फरार असलेल्या आरोपीस उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांच्या पथकाने पोलादपूर (रायगड) येथे मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. रायसिंग शंकर जाधव (वय ४५, रा. करंजओढा बुध) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुध गावाजवळ करंजओढा येथे २०१५ च्या स्वातंत्र्यदिनी दिवसाढवळ्या दुहेरी खून झाला होता. यावेळी खून झालेल्या दोन्ही व्यक्ती ठार झाल्या. या गुन्ह्यातील ११ आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी फरार झालेला रायसिंग जाधव हा गेल्या सहा वर्षांपासून वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. यास पोलादपूर येथे पोलीस ठाण्याच्या मदतीने कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल साहिल झारी व पोलीस कॉन्स्टेबल हेमंत शिंदे यांनी केली.

Web Title: Accused absconding for six years in police custody