लेखा, कोषागार दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:21+5:302021-02-05T09:10:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा कोषागार निवृत्तधारकांना व इतर शासकीय कार्यालयांना अद्ययावत व तत्काळ सेवा देत असल्याने कोषागारातील ...

लेखा, कोषागार दिन उत्साहात साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा कोषागार निवृत्तधारकांना व इतर शासकीय कार्यालयांना अद्ययावत व तत्काळ सेवा देत असल्याने कोषागारातील कर्मचारी, अधिकारी सन्मानास पात्र आहेत. कोषागार दिनानिमित्त विशेष गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांचा सन्मान करून सातारा कोषागाराने वेगळा ठसा निर्माण केला आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.
सातारा जिल्हा कोषागारात कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी १ फेब्रुवारी हा लेखा व कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे, स्थानिक लेखा निधीचे सहायक संचालक शार्दुल पाटील, सातारा नगरपरिषदेच्या मुख्य लेखाधिकारी आरती नांगरे-पाटील, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निवृत्तिवेतनधारकांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा केंद्राचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेची व पाककला स्पर्धेची मान्यवरांनी पाहणी केली.
कोषागाराकडून नेहमीच नावीण्यपूर्ण योजना राबविल्या जातात, असे सांगून जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांनी कोषागार दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास अपर कोषागार अधिकारी योगेश करंजेकर, किशोर सपकाळ, सुहास पवार, सहायक लेखाधिकारी शितल बोबडे यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.