रक्षाविसर्जनाला जाताना युवकाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: February 2, 2015 00:05 IST2015-02-01T23:00:12+5:302015-02-02T00:05:26+5:30

सुर्लीत दुर्घटना : दुचाकीला टेम्पोची धडक

Accidental death of a young man when he goes to defense | रक्षाविसर्जनाला जाताना युवकाचा अपघाती मृत्यू

रक्षाविसर्जनाला जाताना युवकाचा अपघाती मृत्यू

कऱ्हाड : नातेवाइकाच्या रक्षाविसर्जनासाठी निघालेल्या युवकाचा सुर्ली (ता. कऱ्हाड) येथे आज, रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. प्रमोद ऊर्फ पिंटू प्रकाश जाधव (वय ३०, मूळ रा. विसापूर, ता. तासगाव, सध्या रा. कुडीत्रे फॅक्टरी, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विसापूर येथील प्रमोद जाधव हा युवक सध्या कोल्हापूरच्या कुडीत्रे फॅक्टरी परिसरात वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो आपल्या मूळगावी विसापूरला गेला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जाधव कुटुंबीयांच्या नांदगाव येथील नातेवाइकाचे निधन झाले. आज रक्षाविसर्जन विधी होता. या विधीला जाण्यासाठी प्रमोद सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरातून निघाला. तो सुर्ली गावच्या हद्दीत आला असत्रक्षाविसर्जनाला जातानायुवकाचा दुचाकीला जोराची धडक बसली. त्यामध्ये प्रमोदला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)

अपघाताबाबत सुर्ली येथील साजिद शिकलगार यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक गजानन करमन राठोड (३२, रा. खटावा-गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Accidental death of a young man when he goes to defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.