शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वडूज येथील जवान मयुर यादव यांचा अपघाती मृत्यू, वडूज शहरावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 18:58 IST

अंबाला ( पंजाब) कँम्प येथील दुर्घटना.

शेखर जाधववडूज: येथील जवान मयुर जयवंत यादव  ( वय- २९ ) यांचे अंबाला ( राज्य - पंजाब) कँम्प येथे देशसेवा बजावताना अपघाती मृत्यू झाला. ही बातमी समजताच वडूज शहरावर शोककळा पसरली. मृत मयुर यादव यांचे पार्थिव  मंगळवार दिनांक १८ रोजी दुपारी बारा पर्यंत वडूजमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मयुर जयवंत यादव हे १४५ बटालियन मध्ये लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकल वरून जोडीदारांसोबत जात असताना स्पीड ब्रेकर वरून जवान मयुर खाली पडले असता त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने उपचारासाठी अंबाला ( पंजाब) येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सोमवार दिनांक १७ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत जवान मयुर यादव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात  झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच वडूज शहरासह विद्यालयावर शोककळा पसरली होती.

मृत जवान मयुर यादव यांच्या पश्चात वडील सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक जयवंत यादव ,आई, भाऊ हर्षद , पत्नी, तीन वर्षांची आदविता ही मुलगी आहे. अंबाला (  पंजाब) येथून त्यांचे पार्थिव दिल्लीतून विमानाने पुणे येथील विमानतळावर मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यत पोहचणार आहे. पुणे येथून वाहनाने वडूजमध्ये दुपारी बारा पर्यंत त्यांचे पार्थिव पोहचेल अशी माहिती सुत्रांनी दिली. पार्थिवा सोबत त्यांचे भाऊ हर्षद यादव व मिल्ट्रीचे आँफिसर आहेत. 

टॅग्स :satara-acसाताराIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक