कोयनेच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

By Admin | Updated: July 12, 2014 23:51 IST2014-07-12T23:51:44+5:302014-07-12T23:51:59+5:30

संततधार पाऊस : शनिवारी सायंकाळपर्यंत १३.३९ टीएमसी पाणी

Accelerated growth of coal water | कोयनेच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

कोयनेच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

पाटण : गेल्या ३६ तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार व संततधार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात पाऊण टी.एम.सी. पाणीसाठा वाढला आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे दमदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कालच्या तुलनेत दुप्पट झाली आहे.
गेल्या ३६ तासांत कोयना येथे १४७ मि. मी., नवजा येथे १६७ मि. मी. तर महाबळेश्वर येथे १३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. पाटण तालुक्यातील मोरगिरी, ढेबेवाडी, मल्हारपेठ, मणदुरे या भागात दमदार पाऊस झाला. कोयना धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने सुधारणा होत आहे. २०३७ फूट ३ मीटर इतकी पाणीपातळी आहे. एक जूनपासून कोयना येथे ७३० मि. मी, नवजा ८४८ मि. मी., तर महाबळेश्वर येथे ४८१ मि. मी. पाऊस झाला आहे.
कोयना नदीचे उगमस्थान असलेल्या महाबळेश्वर येथे पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही. शनिवारी पाटण तालुक्यातील कोयना व चांदोली अभयारण्यालगत असणाऱ्या गावांना पावसाने झोडपून काढले.
कोयना परिसरात भात लागण, तर तालुक्याच्या डोंगरपठारावरील गावांमध्ये नाचणीची लागण सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Accelerated growth of coal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.