शाळा प्रवेशातील सुसूत्रतेसाठी शिक्षणाधिकारी सतर्क

By Admin | Updated: June 8, 2014 00:52 IST2014-06-08T00:50:56+5:302014-06-08T00:52:26+5:30

शाळांमधील लकी ड्रॉचे निरीक्षक देणार अपडेट

Academic alert to facilitate school admission | शाळा प्रवेशातील सुसूत्रतेसाठी शिक्षणाधिकारी सतर्क

शाळा प्रवेशातील सुसूत्रतेसाठी शिक्षणाधिकारी सतर्क

सातारा : जिल्ह्यात सध्या बालवाडी, पहिलीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी शिक्षण विभागाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात ७७ निरीक्षकांची नेमणूक केली असून, या प्रवेशप्रक्रियेवर त्यांची आॅनलाईन नजर राहणार असल्याची माहिती शिक्षण विभाग्ाांतून देण्यात आली.
दरम्यान, बालवाडी, पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेची आरक्षण सोडत दि. ७ रोजी होणार असल्याचेही सांगण्यात आले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने तक्रार केल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाचे डोळे उघडले. शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रवेश प्रक्रियेवर नजर ठेवून घडलेल्या घडामोडीचा अहवाल पाठविण्यासाठी ७७ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या आलेल्या आॅनलाईन अहवालावर प्रवीण अहिरे लगेच कार्यवाही करणार असल्याचे समजते. ७ जूनपर्यंत सोडतीची अंतिम मुदत होती.
सातारा शहरातील नवीन मराठी शाळा, जिजामाता पॅ्रक्टिसिंग स्कूल या दोन शाळांसह जिल्ह्यातील इतर शाळांचीही आरक्षण सोडत होणार आहे. ९ ते १२ जून रोजी प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया होणार असून, दि. १३ रोजी प्रत्येक तालुकास्तरावर पंचायत समितीत मुख्याद्यापकांची बैठक आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Academic alert to facilitate school admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.