अभ्यास करीत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:14+5:302021-02-18T05:14:14+5:30
सातारा : पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी अभ्यास करीत असताना तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पाटण तालुक्यातील बनपुरी येथील युवकावर औंध पोलीस ...

अभ्यास करीत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार
सातारा : पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी अभ्यास करीत असताना तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पाटण तालुक्यातील बनपुरी येथील युवकावर औंध पोलीस ठाण्यात पोक्सो (बालकांचे लैंगिक शोषण) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंधरावर्षीय मुलगी तिच्या राहत्या घरी अभ्यास करीत होती. तिच्या घरातील सर्वजण झोपले असताना सागर महेंद्र मोहिते (वय २२, रा. बनपुरी, ता. पाटण ) हा तिथे आला आणि त्याने त्या मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार १५ फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजता घडला. याची माहिती समजताच पीडित मुलीच्या आईने औंध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर सागरवर पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून, तो फरार झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक यू. एस. भापकर अधिक तपास करीत आहेत.