अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:42+5:302021-05-03T04:34:42+5:30
फलटण : फलटण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याने दोघांविरोधात पोक्सोअंतर्गत तर एकावर गुन्ह्यात मदत केली म्हणून गुन्हा ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक, एक फरार
फलटण : फलटण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याने दोघांविरोधात पोक्सोअंतर्गत तर एकावर गुन्ह्यात मदत केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन येथील एका अल्पवयीन मुलीबरोबर ओळख निर्माण करीत एका लॉजवर नेऊन दोघांनी अत्याचार केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सुयोग गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही,रा. लक्ष्मीनगर फलटण) याने २० नोव्हेंबर २०२० रोजी लॉजवर नेऊन त्या मुलीवर अत्याचार केला. या मुलीला सुयोग गायकवाड याचा मित्र प्रीतम चोरमले (रा. फरांदवाडी, ता. फलटण) याने त्याच्या गाडीतून लॉजवर नेले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती घेऊन ‘जे त्याला दिले, ते मला दे नाहीतर तुझ्या घरी सांगेन,’ असे म्हणून तिसरा संशयित आरोपी महेश ननावरे (रा. खुंटे रोड, चौधरवाडी, ता. फलटण) याने एका लॉजवर इच्छेविरुद्ध जबरदस्तीने त्या मुलीवर अत्याचार केले.
वरील तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुयोग गायकवाड व महेश ननावरे या दोघांना पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे.