युवतीवर अत्याचार करून गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:23+5:302021-02-18T05:14:23+5:30

सातारा : एका २७ वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून गर्भपात केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात केतन ...

Abortion by torturing a young woman | युवतीवर अत्याचार करून गर्भपात

युवतीवर अत्याचार करून गर्भपात

सातारा : एका २७ वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून गर्भपात केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात केतन बर्गे याच्यावर गुन्हा दाखल झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केतनने पीडित युवतीशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. 'माझे तुझ्यावर प्रेम असून, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,' असे बोलून त्याने वेळोवेळी साताऱ्यात तसेच विविध ठिकाणी पीडितेवर अत्याचार केला. त्यामुळे युवती गर्भवती राहिली. त्यानंतर केतनने गोड बोलून तिला ३० मे २०२० रोजी गर्भपात करायला भाग पाडले. या दोघांनीही २० नोव्हेंबर रोजी विवाह केला. मात्र, केतन याने यानंतर काही दिवसांतच १५ डिसेंबर रोजी दुसरे लग्न केले. याची माहिती पीडित युवतीला समजताच तिने कोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन केतनविरोधात तक्रार दाखल केली.

Web Title: Abortion by torturing a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.