शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित बिचुकलेला पुन्हा खंडणीच्या गुन्ह्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:45 IST

धनादेश न वटल्याने बिग बॉसच्या घरातून अटक केलेल्या अभिजित बिचुकले याला जामीन मिळताच तत्काळ सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या दुसऱ्या खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली.

सातारा -  धनादेश न वटल्याने बिग बॉसच्या घरातून अटक केलेल्या अभिजित बिचुकले याला जामीन मिळताच तत्काळ सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या दुसऱ्या खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून, त्याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.बिचुकलेवर सातारा न्यायालयात भा. दं. वि. १३८ अन्वये गुन्हा दाखल होता. २८ हजारांचा धनादेश वटला नसल्यामुळे त्याच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. सातारा पोलिसांनी बिचुकलेला शुक्रवारी मुंबईतून अटक करीत साताºयात आणले. त्याची जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले. शनिवारी दुपारी अडीच वाजता त्याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात नेण्यात आले.प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी आर. व्ही. पाटील यांनी बिचुकलेची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता करत असल्याचे जाहीर केले. काही क्षणातच पोलिसांनी न्यायालयासमोर दुसरा अर्ज सादर केला. २०१३ मध्ये अभिजित बिचुकलेवर शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यामध्ये आम्हाला त्याला अटक करायची आहे, असे पोलिसांनी न्यायालयापुढे सांगितले. न्यायाधीशांनी बाजू ऐकून घेऊन पोलिसांचा अर्ज मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी अभिजित बिचुकलेला तत्काळ अटक केली. सध्या त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, सोमवार, दि. २४ रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेCrime Newsगुन्हेगारी