व्याजाच्या पैशांसाठी अपहरण करून मारहाण
By Admin | Updated: December 26, 2014 00:19 IST2014-12-25T21:40:19+5:302014-12-26T00:19:25+5:30
दरम्यान, बुधवारी चारचाकीतून अज्ञातस्थळी नेऊन मारहाण करण्यात आली.

व्याजाच्या पैशांसाठी अपहरण करून मारहाण
फलटण : दहा टक्के व्याजाने घेतलेले दोन लाख परत न केल्याने लोखंडी पाईप व हाताने मारहाण करण्यात आली. मारहाणप्रकरणी सात जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बुधवारी चारचाकीतून अज्ञातस्थळी नेऊन मारहाण करण्यात आली. यामध्ये रणवरे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हरिभाऊ रणवरे (वय ४५, रा. महतपुरा पेठ, फलटण) यांनी आठ महिन्यांपूर्वी जिजाबा भगवान करचे (रा. सोमंथळी) याच्याकडून दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. ते परत दिले नाही म्हणून जिजाबा करचे व इतर सहा जणांनी करचे यांना पाईपाने मारहाण केली. ‘पैसे न दिल्यास बायको, मुलाचे अपहरण करण्याची धमकीही संबंधितांनी रणवरे यांना दिली आहे, अशी तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत तालुक्यात प्रथमच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत. (प्रतिनिधी)