रामकृष्णनगर येथून परप्रांतीय भावंडाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:10+5:302021-02-05T09:20:10+5:30
सातारा : तालुक्यातील रामकृष्णनगर येथून गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास परप्रांतीय भावंडांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद ...

रामकृष्णनगर येथून परप्रांतीय भावंडाचे अपहरण
सातारा : तालुक्यातील रामकृष्णनगर येथून गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास परप्रांतीय भावंडांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कविता राजू ठाकरे (वय २७, मूळ रा. खेदिया, ता. पानछेल, जि. बडवानी, राज्य - मध्य प्रदेश. सध्या रा. रामकृष्णनगर, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवार, दि. २८ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुलगी सविता राजू ठाकरे (वय १४) आणि विनोद राजू ठाकरे (वय ९) या दोघांना रामकृष्णनगर येथून कोणतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी कविता यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक फौजदार पायमल हे करत आहेत.