‘आरोग्य मंदिर’ बनले ‘आयएसओ’ मानांकन

By Admin | Updated: November 18, 2015 00:09 IST2015-11-17T21:43:26+5:302015-11-18T00:09:01+5:30

कोळे प्राथमिक आरोग्य केंद्र : जिल्ह्यातील पहिल्या पाच ‘आयएसओ’ प्राथमिक आरोग्य केंद्रात सहभाग

'Aastha Mandir' became the 'ISO' ranking | ‘आरोग्य मंदिर’ बनले ‘आयएसओ’ मानांकन

‘आरोग्य मंदिर’ बनले ‘आयएसओ’ मानांकन

कऱ्हाड : रुग्णांसाठी आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत, आवश्यक प्रयोगशाळा, सर्व सुविधांयक्त आॅपरेशन थिएटर, उत्तम रु ग्णतपासणी अशा वैशिष्ट्यांमुळे कऱ्हाड तालुक्यातील ‘आरोग्य मंदिर’ म्हणजे कोळेचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्ह्यातील इतर प्राथमिक केंद्रापैकी ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. कोळे येथील प्राथमिक आरोग्यातील सुविधांची पाहनी करत ‘आयएसओ’ मानांकनाच्या पथकाने नुकतीच कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत प्रमाणपत्र प्रदान केले.
शासनाच्या निधीचा सुयोग्य वापर अन् लोकवर्गणीच्या माध्यमातून कोळे प्राथमिक आरोग्य केंद्र जणू आरोग्य मंदिरच बनले आहे. त्याचा हा कायापालट इतरांना प्रेरणादायी आहे.कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार घोगरे यांनी शासनाच्या विविध योजना प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविल्या. त्यासाठी शासनाकडून १६ लाखांचा निधी प्राप्त केला. याला गावातील ग्रामस्थांनी देखील सहकार्य केले.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुधारणेसाठी शासनाकडून १६ लाखांचा निधी मिळवून तसेच ग्रामस्थांनी १६ लाखांची लोकवर्गणी एकत्र करून या आरोग्य केंद्रात सुधारणा केली. आतापर्यंत ग्रामस्थांच्या सहकार्याने कोळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक मंदिर, दोन संगणक संच, एक प्रिंटर, आणत बागबगीचा, मुलांसाठी खेळणी अशा सुधारणा केलेल्या आहेत.कोळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेल्या सुविधांमुळे परिसरातील रुग्णांनाही याचा लाभ होत आहे. तालुक्यातील एक सुसज्ज असे कोळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र खऱ्या अर्थाने आरोग्य मंदिर बनले आहे. (प्रतिनिधी)


या आहेत सुविधा...सुसज्ज इमारतीसह लॅब, सर्वसोयींनियुक्त आॅपरेशन थिएटर, अद्यावत फर्निचर, सौरऊर्जा सोलर, वॉशिंग मशिन अशा सुविधा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत.
रुग्णांसह नातेवाइकांनाही सुविधा
कोळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एखादा रुग्ण उपचारासाठी नातेवाईक घेऊन आल्यास रुग्णाच्या नातेवाइकांनाही राहण्याची सुविधा पुरविली जाते. याउलट काही ठिकाणी मात्र, रुग्णांसह नातेवाइकांची हेळसांड केली जात असल्याचे दिसून येते.

Web Title: 'Aastha Mandir' became the 'ISO' ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.