अबब.. महाबळेश्वरात ३,५०९ मिमी पाऊस..

By Admin | Updated: August 3, 2016 00:20 IST2016-08-03T00:20:58+5:302016-08-03T00:20:58+5:30

वेण्णा पूल पाण्याखाली : दरडी कोसळण्याची मालिका; एसटी बसेसची चाके थांबली

Aab .. 3,509 mm rain in Mahabaleshwar .. | अबब.. महाबळेश्वरात ३,५०९ मिमी पाऊस..

अबब.. महाबळेश्वरात ३,५०९ मिमी पाऊस..

महाबळेश्वर : महाबळेश्वरात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत येथे ३८९.३ मि.मि एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली तर आजअखेर येथे एकूण ३५०९ मि.मि म्हणजेच १३८ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागीलवर्षी आजअखेर येथे १०१ इंच पाऊस झाला होता.
वेण्णा लेक धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर आल्याने हा रस्ताच पाण्याखाली गेला होता. तसेच अनेक घरामध्ये दोन ते तीन फूट पाणी शिरले होते रस्ता पाण्याखाली गेल्याने रात्रीपासून वाहतूक ठप्प झाली होती. शहराकडे आलेल्या सर्व वाहने अडकून पडली होती. तर कोकणातून आलेल्या सर्व एसटी गाड्या महाबळेश्वर येथेच अडकून पडल्या होत्या. विविध खात्यांचे अधिकारी यांनी वेण्णा लेकजवळ तळ ठोकला होता. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकरही वेण्णा लेक येथे उपस्थित होते. अंबेनळी घाटात मेटतळे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली होती. ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने जेसीपीच्या साह्याने सकाळी दहा वाजल्यापासून ही दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याने दुपारी २ नंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम खात्याला यश आले. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावरही दोन ते तीन ठिकाणी लहान लहान दरडी कोसळल्या. त्याच प्रमाणे केळघर घाट सुरू होताना माचुतर गावाच्या हद्दीत गणेश मंदिराजवळही दरड कोसळली होती. (प्रतिनिधी)
 

Web Title: Aab .. 3,509 mm rain in Mahabaleshwar ..