शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई कराच, मग बघून घेतो!; महिला वाहतूक पोलिसाला दमदाटी, कऱ्हाडात युवकावर कारवाई

By संजय पाटील | Updated: May 23, 2024 15:19 IST

कऱ्हाड : कऱ्हाडात महामार्गावर उलट्या दिशेने प्रवास करताना रोखल्यावर महिला वाहतूक पोलिसाला एका युवकाने दमदाटी केली. माझ्यावर कारवाई करण्याचे ...

कऱ्हाड : कऱ्हाडात महामार्गावर उलट्या दिशेने प्रवास करताना रोखल्यावर महिला वाहतूक पोलिसाला एका युवकाने दमदाटी केली. माझ्यावर कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत, असे म्हणत दंड कर मग बघून घेतो, अशी धमकीच त्याने दिली. अखेर या युवकाला हिसका दाखवत पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडच्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी प्रियांका यादव या मलकापूर येथे महामार्गावर हॉटेल नवरंगसमोर कर्तव्य बजावत होत्या. मलकापूर फाटा ते कोल्हापूर नाका यादरम्यान नव्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असल्याने उलट्या बाजुने वाहने चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, एक युवक दुचाकीवरुन उलट्या दिशेने प्रवास करताना वाहतूक कर्मचारी प्रियांका यादव यांच्या निदर्शनास आला. त्यांनी संबंधित युवकाला थांबवले. तसेच वाहतूक कोंडी असून उलट दिशेने प्रवास करणे नियमबाह्य असल्याचे त्यांनी युवकाला सांगितले. संबंधित युवकाच्या दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्याबाबतही पोलीस कर्मचारी यादव यांनी युवकाकडे विचारणा केली. मात्र, दुचाकी अडवल्याचा राग मनात धरुन त्या युवकाने पोलीस कर्मचारी यादव यांच्यावरच आरेरावी केली. तुम्ही मला नियम सांगू नका. मला हे विचारण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत. माझ्यावर दंडाची कारवाई केली तर बघून घेतो, अशी दमदाटी त्या युवकाने केली. तसेच त्यानेच या वादावादीचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले. वाहतूक कर्मचारी प्रियांका यादव यांनी त्या युवकाला अडविण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांना न जुमानता तेथून निघून गेला.दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, गृहरक्षक दलाचे प्रणय लोकरे यांनी काही अंतरावर संबंधित युवकाला अडवून ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचारी प्रियांका यादव यांच्या तक्रारीनुसार संबंधित युवकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliceपोलिस